ETV Bharat / state

मुंबई महापालिकेची झिरो प्रिस्क्रिप्शन योजना अजूनही लागू नाही, योजनेला मुहूर्त मिळणार तरी कधी? - ZERO PRESCRIPTION POLICY

झिरो प्रिस्क्रिप्शन योजना ही माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना. या योजनेची सुरुवातच झालेली दिसत नाही. वाचा काय आहे सध्य परिस्थिती.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2025, 7:21 PM IST

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिकांपैकी एक आहे. पालिकेचं वार्षिक बजेट देशातील कोणत्याही पालिकेच्या तुलनेत सर्वाधिक आहे. देशातील काही राज्यांच्यापेक्षाही ते जास्त आहे. त्यामुळं मुंबईकरांना देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अनेक अपेक्षा आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण महानगरपालिकेत लवकरच राबवलं जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याच काळात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना देखील सुरू झाली. झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण 2024 मध्ये राबवलं जाईल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. मात्र, 2024 चं पूर्ण वर्ष गेलं तरी हे धोरण अमलात आलेलं नाही. त्यामुळं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या झिरो प्रिस्क्रिप्शन धोरणाला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न सध्या मुंबईकर विचारत आहेत.

झिरो प्रिस्क्रिप्शन योजनेची प्रतीक्षा - तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये जानेवारी 2024 पासून हे धोरण लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आता 2025 उजाडले तरी हे धोरण लागू झालेलं नाही. गेल्या वर्षीचा जानेवारी महिना संपला. त्यानंतर एप्रिल 2024 मध्ये या धोरणाची अंमलबजावणी होईल असं म्हटलं गेलं. मात्र, ही योजना एप्रिल महिन्यात देखील अमलात आली नाही. पुढे लोकसभा निवडणुका लागल्या. आचारसंहितेचं कारण देत ही योजना बारगळली. त्यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे 2024 चं वर्ष निवडणूक आणि त्यांच्या आचारसंहितेत गेल्यानं या धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना सध्या ह्या झिरो प्रिस्क्रिप्शन योजनेची प्रतीक्षा आहे.

योजना नेमकी काय आहे - आता पालिकेची ही झिरो प्रिस्क्रिप्शन योजना नेमकी काय आहे ते देखील समजून घेऊयात. या झिरो प्रिस्क्रिप्शन योजनेअंतर्गत रुग्णांना पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सर्व आवश्यक औषधे मोफत मिळणार आहेत. पूर्वी रुग्णांना काही औषधे घेण्यासाठी बाहेर जावं लागत होतं. मात्र, हे धोरण लागू झाल्यानंतर सर्व औषधं पालिका रुग्णालयांमध्येच रुग्णांना उपलब्ध होणार आहेत. पालिकेकडे आता या पॉलिसी अंतर्गत खरेदी केलेल्या औषधांच्या यादीत 1,600 औषधे आहेत, ज्यात तापाचे औषध, ग्लुकोज, IV संच, शस्त्रक्रिया उपकरणे, चाचणी किट यांचा समावेश आहे. आता ही यादी 1,600 वरून 4,000 करण्यात येत आहे.

मुंबईत किती दवाखाने - आज घडीला मुंबई शहरात बृहन्मुंबई महानगरपालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालयं आणि हॉस्पिटल आहेत. एक दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल आहे. 16 उपनगरीय रुग्णालयं तर चार विशेष रुग्णालयं आहेत. 30 प्रसूती रुग्णालयं आणि 192 दवाखाने कार्यरत आहेत. सोबतच 202 हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाने देखील कार्यरत आहेत. या सर्व दवाखान्यांमध्ये पालिकेच्या या झिरो प्रिस्क्रिप्शन योजनेचा मुंबईकरांना लाभ मिळणार आहे. मात्र, अद्याप योजना लागू न झाल्यानं मुंबईकरांना त्याची प्रतीक्षाच आहे.

आचारसंहितेचा रोडा - आतापर्यंत किरकोळ ताप खोकला, वेदनाशामक, इंजेक्शन आणि ग्लुकोज यासह अन्य 1,600 औषधं महानगरपालिका रुग्णांना मोफत पुरवते. आता या झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी अंतर्गत 5 हजार हून अधिकची औषधे आणि वस्तू रुग्णांना मोफत पुरवावी लागणार आहेत. 2024-25 च्या अर्थसंकल्पात एक एप्रिल पासून या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं पालिकेनं जाहीर केलं होतं. मात्र, निविदा प्रक्रियेला झालेला विलंब, निवडणुका आणि आचारसंहिता यामुळं या पॉलिसीला वेळ लागत असल्याचं पालिका प्रशासनानं म्हटलं आहे.

हेही वाचा..

  1. नाशिक महानगरपालिकेला शहरात 'आपला दवाखान्यां'ना जागा मिळतं नसल्यानं 10 कोटी परत जाणार?
  2. Eknath Shinde : विकासकामांमुळे पोटदुखी होत असेल तर 'आपला दवाखाना' मध्ये मोफत उपचार घ्या; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.