साईचरणी 43 लाखांचा सुवर्ण मुकुट दान; पहा व्हिडिओ - Golden Crown Donation - GOLDEN CROWN DONATION
Published : Jun 16, 2024, 2:20 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Golden Crown Donation : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात. तसंच आपल्या इच्छेनुसार अनेकजण साईंच्या झोळीत देणगी टाकतात. आज एका साईभक्त परिवारानं साईबाबांच्या चरणी तब्बल 43 लाख रुपयांचा सुवर्ण सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. "माझ्याकडं जे काही आहे, ती सगळी साईबाबांची कृपा आहे. आम्ही आज साईबाबांच्या चरणी 648 ग्रॅम वजनाचा सुवर्ण सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. त्याची किमत 43 लाख रुपये आहे," असं भाविकाकडून सांगण्यात आलंय. मात्र, एवढं मोठं सुवर्ण दान देणाऱ्या भाविकानं आपलं नाव आणि गाव जाहीर न करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान, मुर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साईभक्तानं संस्थानला आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलीय.