भंडारा उधळत माउलींचा जयघोष, जेजुरी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा प्रवेश; पाहा ड्रोन व्हिडिओ - Dnyaneshwar Maharaj Palkhi - DNYANESHWAR MAHARAJ PALKHI
Published : Jul 4, 2024, 10:09 PM IST
|Updated : Jul 5, 2024, 11:42 AM IST
जेजुरी (पुणे) Dnyaneshwar Maharaj Palkhi : 'सदानंदाचा येळकोट…येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष करीत आणि भंडार्याची उधळण करीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आणि वारकऱ्यांचं आगमन खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत झालं आहे. यावेळी ग्रामस्थांच्यावतीनं देवाचं लेणं असणारा भंडारा उधळून माउलींच्या पालखी सोहळ्याचं आणि वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सासवड-जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती. अभंगांच्या ओवीला टाळ-मृदंगांची साथ, खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, पायांना लागलेली विठुमाऊलीची ओढ आणि वाटेवरच असणार्या कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाची ओढ घेऊन भाविक रस्ता चालत आज पालखी सोहळ्यानं जेजुरी नगरीत प्रवेश केला. यावेळी जेजुरीचे रस्ते भाविकांनी आणि वारकऱ्यांनी फुलून गेले होते. बघूया याचे ड्रोन व्हिडिओ...