महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क, काय म्हणाले?

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

नागपूर : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात (Maharashtra Assembly Election 2024) आज (20 नोव्हेंबर) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (rss chief Mohan Bhagwat casting vote) यांनी सातच्या ठोक्यालाच आपला मतदानाचा हक्क बजवलाय. शहरातील संघ मुख्यालयाजवळ असलेल्या भाऊजी दप्तरी शाळेतील मतदान केंद्रात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मतदान केलंय. यावेळी त्यांच्यासोबत माजी सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी देखील मतदान केलंय. शतप्रतिशत मतदानाचा आग्रह डॉ. मोहन भागवत नेहमी धरतात. त्यामुळं त्यांनीही घड्याळात सातचा ठोका पडताच थेट मतदान केंद्र गाठलं. आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचं पालन केलं. तसंच यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. "मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते सर्वांनी पार पाडलं पाहिजे." असंही त्यांनी म्हटलंय. 

ABOUT THE AUTHOR

...view details