दुबई PAK vs IND 5th Match Live : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात सुरु आहे. या महामुकाबल्याची नाणेफेक झाली आहे. यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवाननं त्याच्या संघात बदलाची घोषणा केली. दुखापतीमुळं फखर झमान बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघात इमाम उल हकची जागा देण्यात आली आहे.
1⃣4⃣0⃣0⃣0⃣ ODI RUNS for Virat Kohli 🫡🫡
— BCCI (@BCCI) February 23, 2025
And what better way to get to that extraordinary milestone 🤌✨
Live ▶️ https://t.co/llR6bWyvZN#TeamIndia | #PAKvIND | #ChampionsTrophy | @imVkohli pic.twitter.com/JKg0fbhElj
भारताला 242 धावांची गरज : पाकिस्ताननं दिलेल्या 242 धावांचं पाठलाग करताना टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीनं रोहितला (20) बोल्ड करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर टीम इंडियाचा उपकर्णधार गिलनं आक्रमक फटके मारले. यादरम्यान 14व्या षटकात चौकार मारत विराट कोहलीनं वनडेत 14000 धावांचा पल्ला गाठला. भारताच्या आता 90हून अधिक धावा झाल्या आहेत.
Innings Break!
— BCCI (@BCCI) February 23, 2025
A fine bowling display from #TeamIndia and Pakistan are all out for 2⃣4⃣1⃣
3⃣ wickets for Kuldeep Yadav
2⃣ wickets for Hardik Pandya
A wicket each for Axar Patel & Ravindra Jadeja
Over to our batters 🙌
Scorecard ▶️ https://t.co/llR6bWyvZN#PAKvIND |… pic.twitter.com/Xo9DGpaIrX
हार्दिकनं घेतली पहिली विकेट : या सामन्यात नाणेफेक जिंकत पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सौद शकील (62), मोहम्मद रिझवान (46) आणि शेवटच्या षटकात खुशदिल शाहनं (38) केलेल्या आक्रमक खेळीनं पाकिस्तानला 241 धावांचा आकडा गाठता आला. भारताकडून कुलदीपनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर शमीला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. आता भारताला सामना जिंकण्यासाठी 242 धावांची आवश्यकता आहे. भारतानं हा सामना जिंकल्यास सेमीफायनलचं तिकीट जवळपास निश्चित आहे.
The rivalry resumes 🤜 🤛
— ICC (@ICC) February 23, 2025
How to watch 👉 https://t.co/S0poKnwS4p#PAKvIND #ChampionsTrophy pic.twitter.com/pPKQP99vit
रोहित शर्मानं पाकिस्तानविरुद्ध खेळली चाल : 2023 च्या वनडे विश्वचषकानंतर इमाम उल हक पाकिस्तानी संघासोबत वनडे सामना खेळणार आहे. इमाम व्यतिरिक्त, पाकिस्तान संघातील उर्वरित खेळाडू तेच आहेत जे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसले होते. भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी त्यांच्या विजयी संघासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानसाठी करा किंवा मरो सामना : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोघांचाही हा दुसरा सामना आहे. यापूर्वी, पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर भारतानं पहिल्या सामन्यात बांगलादेशला 6 विकेट्सनं पराभूत केलं होतं. पहिला सामना गमावल्यानंतर, भारताविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती बनली आहे. जर आज पाकिस्तानी संघ हरला तर त्याच्यासाठी स्पर्धेत दरवाजे बंद होतील. पाकिस्तानला हरवून भारतीय संघ उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, हर्षित राणा.
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, सलमान आघा, सौद शकील, इमाम-उल-हक, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.
हेही वाचा :