गुमला (रांची) : तेलंगणा बोगदा दुर्घटनेत आठ कामगार अडकले आहेत. यापैकी चार कामगार हे झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहेत. कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, शनिवारी तेलंगणातील नगरकुरनूल जिल्ह्यात श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल बोगदा प्रकल्पाचा भाग कोसळल्यानं गुमला येथील 4 कामगारांसह एकूण 8 कामगार अडकले होते.
'या' कामगारांचा समावेश : बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या गुमला जिल्ह्यातील चार कामगारांमध्ये सदर पोलीस स्टेशन परिसरातील तिर्रा गावातील रहिवासी संतोष साहू, घाघरा पोलीस स्टेशन परिसरातील खांभिया कुंबा, टोली येथील रहिवासी अनुज साहू, रायडीह पोलीस स्टेशन परिसरातील कोबी, टोली गावातील रहिवासी जगता खेश आणि पालकोट पोलीस स्टेशन परिसरातील उमदा नाकती, टोली गावातील रहिवासी संदीप साहू यांचा समावेश आहे.
दुर्घटनेची फोनवरून माहिती मिळाल्यानंतर कामगारांच्या कुटुंबातील सर्व सदस्य चिंतेत आहेत. संदीप साहू यांच्या पत्नी संतोषी यांनी सांगितलं की, त्यांचे पती गेल्या वर्षी कामासाठी तेलंगणाला गेले होते. अपघाताची माहिती मिळताच संदीपची पत्नी संतोषी देवी, मुलगा ऋषभ, मुलगी रीमा आणि राधिका यांना अश्रू अनावर झाले. घाघरा येथील अनुज साहू दोन महिन्यांपूर्वी कामावर गेले होते. घटनेची माहिती मिळताच, एसडीपीओ सुरेश प्रसाद यादव, घागरा ठाणेदार तरुण कुमार इत्यादींनी कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. तसंच कामगारांना सुरक्षित परत आणण्याचं आश्वासन दिलं.
तेलंगाना के नागरकुरनूल जिले में श्रीशैलम लेफ्ट बैंक कैनाल टनल हादसे में झारखण्ड समेत अन्य राज्यों के कुछ श्रमिकों के फंसे होने की खबर मिली है।
— Hemant Soren (@HemantSorenJMM) February 22, 2025
तेलंगाना के माननीय मुख्यमंत्री श्री @revanth_anumula जी से आग्रह है कि टनल हादसे में हरसंभव रेस्क्यू मदद पहुंचाने की कृपा करें। मैं…
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना सर्व कामगारांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन केलंय. तसंच "झारखंड सरकार तेलंगणा सरकारच्या संपर्कात आहे आणि अपघाताशी संबंधित मिनिट-टू-मिनिट माहिती घेत आहे," असंही त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा -