"एकनाथ शिंदेंच्या नादी लागाल तर...."; रामदास कदम उद्धव ठाकरेंवर कडाडले - Ramdas Kadam Uddhav Thackeray
Published : Mar 9, 2024, 10:03 PM IST
रत्नागिरी Ramdas Kadam On Uddhav Thackeray : शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केलीय. दरम्यान, दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. "उद्धव ठाकरेच खऱ्या अर्थाने गद्दार आहेत. उद्धव ठाकरे भोळे नाहीत, कपटी माणूस आहे. दिवा विझताना फडफडतो तशी तुमची अवस्था झाली आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नादाला लागाल तर खबरदार, एकनाथ शिंदे यांच्या मागे रामदास कदम उभा आहे," असा इशाराच रामदास कदम यांनी दिलाय. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांची जीभ घसरली. त्यांनी उद्धव ठाकरे यांचा Aकेरी उल्लेख करत जोरदार हल्ला चढवला.