महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नागपुरातील विद्यार्थ्यांनी तयार केली भव्य इको फ्रेंडली राखी; पाहा व्हिडिओ - Raksha Bandhan 2024 - RAKSHA BANDHAN 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 11:01 AM IST

नागपूर Raksha Bandhan 2024 : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन आज देशभरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतोय. या निमित्तानं नागपुरातील ललिता पब्लिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क २२x२२ फूट एवढ्या आकाराची इको फ्रेंडली राखी साकारली. 'एक पेड़ मां के नाम' हा सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशानं ही भव्य राखी साकारली.  

विद्यार्थ्यांनी घरातूनच आणलं साहित्य : घरात वापरातील विविध साहित्य गोळा करून विद्यार्थ्यांनी ही राखी तयार केली. ही राखी पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. विद्यार्थ्यांनी सुमारे आठवड्याच्या मेहनतीनंतर ही इको फ्रेंडली राखी तयार केली. त्यासाठी लागलेलं प्रत्येक साहित्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातूनच गोळा केलं. त्यानंतर भव्य राखी बनवण्याचा उपक्रम पूर्ण केला. दरवर्षीच या शाळेत विद्यार्थ्यांच्या हातून एक मोठी राखी बनवून घेण्याचा उपक्रम राबवला जातो. गेल्या वर्षी इस्रोच्या शास्त्रज्ञांना राखी समर्पित करण्यात आली होती. या शिवाय आज जागतिक छायाचित्रण दिवससुद्धा आहे, त्यानिमित्तानं राखीमध्ये छायाचित्र साकारले आहे. या भव्य राखीला साकारण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अपार मेहनत घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details