भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी पत्रकाराच्या भूमिकेत, सर्वसामान्यांना विचारले प्रश्न; पाहा व्हिडिओ - राहुल गांधी
Published : Feb 3, 2024, 10:57 PM IST
गोड्डा (झारखंड) Rahul Gandhi in Godda : झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान एकीकडं राहुल गांधींनी मीडियावर हल्लाबोल करत अदानी आणि भाजपाची यंत्रणा असल्याचं म्हटलंय. तोच दुसरीकडं ते स्वत: पत्रकाराच्या भूमिकेत आले आणि सर्वसामान्यांचा प्रश्न विचारु लागले. त्यांनी एका महिलेला विचारलं की, "तुम्ही एक महिला आहात, मला सांगा तुम्हाला कसला त्रास आहे? केंद्र सरकारच्या धोरणांवर तुम्ही किती खूश आहात?" यानंतर राहुल गांधी यांनी युवकांना रोजगार मिळाला की नाही असं विचारलं, त्यानंतर त्यांच्या प्रश्नावर तरुणांनी आपलं मत मांडलं. राहुल गांधी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी सर्वसामान्यांना महागाईवर प्रश्न विचारले. तसंच अदानी आणि अंबानींशी संबंधित प्रश्नही विचारले. विशेष म्हणजे गोड्डा येथे अदानी पॉवर प्लांट आहे. यातील उत्पादित वीज बांगलादेशात जाते असा आरोप आहे. यानंतर राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या समस्याही ऐकल्या. तसंच शेतकऱ्यांनी आपल्यासमोर येऊन आपल्या समस्या मांडा आणि थेट बोला, असं आवाहनही राहुल गांधींनी केलं.