महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

स्वतःला राजा समजणाऱ्यांना जनतेनं घरी बसवलं पाहिजे, आमदार गोळीबार प्रकरणावर प्रकाश आंबेडकर कडाडले

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 9:15 PM IST

बीड Prakash Ambedkar : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी फडणवीसांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकरांनी सावध पवित्रा घेतल्याचं आज दिसून आलं. उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराची घटना दुर्दैवी आहे. राजकारणाची पातळी पूर्णपणे घसरली आहे. जिथं मसल पॉवर नव्हती, तिथं मसल पॉवर येऊ लागलीय. गोळीबाराच्या घटनेचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. लोकशाहीत तुमचे कितीही मतभेद असले, तरी तुम्ही राजे नाही. लोक तुम्हाला राजा बनवतात. निवडून आलेल्या आमदारानं लोकशाहीच्या मर्यादेत स्वत:वर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्यामुळं जनतेनं स्वत:ला राजा समजणाऱ्यांना घरी बसवायला हवं, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते आज बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. एक-दोन घटनांमुळं गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, की संपूर्ण यंत्रणाच कोलमडली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्येकवेळी एखादी घटना घडली की राजीनाम्याची मागणी होते. मात्र, अशा घटना होणार नाहीत याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. त्यानंतरही अशा घटना घडल्या तर ते अपयशी ठरत असल्याचं म्हणता येईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.  

ABOUT THE AUTHOR

...view details