धावत्या रुग्णवाहिकेनं अचानक पेट घेतल्यानं ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, पाहा थरारक व्हिडिओ - JALGAON OXYGEN CYLINDER BLAST

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2024, 7:16 AM IST

Updated : Nov 14, 2024, 7:31 AM IST

जळगाव : धरणगावहून जळगावकडं येणाऱ्या धावत्या रुग्णवाहिकेला अचानक आग (Ambulance Caught Fire In Jalgaon) लागून नंतर रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट (Oxygen cylinder blast) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर गुजरात पेट्रोल पंपाजवळ घडली. या स्फोटामध्ये रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली आहे. रुग्णवाहिकेला आग लागल्याच्या प्रकार लक्षात येताच चालकानं रुग्णवाहिकेतून खाली उडी मारली. तसंच तत्काळ रुग्णालाही बाहेर काढलं. त्यामुळं सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन पथकानं त्वरित धटनास्थळाकडं धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. तसंच घटनेमुळं काहीवेळ महामार्गावरील वाहतूकदेखील ठप्प झाली होती.

Last Updated : Nov 14, 2024, 7:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.