राहुल गांधींनी दिली अचानक नांदेडच्या बसस्थानकात भेट, रस पीत नागरिकांशी साधला संवाद - RAHUL GANDHI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 14, 2024, 9:29 PM IST
नांदेड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज त्यांची नांदेड येथे प्रचार सभा पार पडली. प्रचार सभा पार पडल्यानंतर त्यांनी अचानक नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकात जाऊन नागरिकांची भेट घेतली. बस्थानाकात ऊसाचा रस पीत राहुल गांधी यांनी नागरिकांसोबत चर्चा केली. तर राहुल गांधींच्या अचानक भेटीमुळं सुरक्षा यंत्रनेची देखील मोठी धावपळ झाली. यावेळी महिला आणि रसवंती गृह चालक राहुल गांधी यांच्या भेटीनं भारावून गेले होते.
बस स्थानकात झाली मोठी गर्दी : राहुल गांधी यांनी नवीन मोंढा येथील सभा संपवून त्याचा ताफा अचानक बस स्थानकाकडं वळाला. यामुळं सुरक्षा रक्षक यांची देखील धावपळ झाली. प्रत्यक्ष राहुल गांधींना पाहण्यासाठी बस स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती, तर काही काळ या गर्दीमुळं बस स्थानकाबाहेर गाड्या काढता आल्या नाहीत.