हैदराबाद International Space Station Cracked : बोईंग स्टारलाइनर अंतराळयानाला विलंब झाल्यामुळं सुनीता विल्यम्ससह त्यांचे बुच विल्मोर पाच महिन्यांहून अधिक काळ आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर (ISS) अडकून पडले आहेत. त्यातच स्पेश स्टेशनमध्ये 50 हून अधिक भेगा पडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळं अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नासा या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कठोर परिश्रम करत असल्याची माहिती आहे, परंतु परिस्थिती गंभीर झाल्यास अंतराळवीरांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तसंच बुच विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाच महिन्यांहून अधिक काळ अडकून पडले आहेत. कारण बोईंगच्या स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं अंतराळ याना त्यांना तिथच सोडून पृथ्वीवर परतलं होतं. त्यामुळं स्पेसवरील नवीन सुरक्षा समस्या अंतराळवीरांच्या आरोग्याबद्दल चिंता वाढवत आहेत.
परिस्थिती अधिक गंभीर : ISS ला भेगा पडल्याची परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. याबाबत NASA नं सांगितलं की, स्पेस स्टेशनवरील क्रॅक आणि गळतीची संख्या आता 50 पेक्षा जास्त झाली आहे. ज्यामुळं तिथं राहणाऱ्या अंतराळवीरांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. स्टेशनचं नुकसान झाल्यामुळं संपूर्ण क्रूच्या सुरक्षिततेची हमी घेता येणार नाहीय. नुकत्याच लीक झालेल्या NASA अहवालात ISS ला गंभीर धोके असल्याचं समोल आलं आहे. स्टेशनच्या स्ट्रक्चरला तडे आणि गळती लवकर दुरुस्त न केल्यास सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना जीवास धोका निर्माण होण्याची भीती या अहवालामुळं वाढली आहे.
काय झाली चूक? : सुनीता विल्यम्स आणि विल्मोर बुच सप्टेंबरमध्ये पृथ्वीवर परतणार होते. मात्र, त्यांना आणण्यासाठी डिझाइन केलेल्या बोईंग स्टारलाइनर अंतराळयानामध्ये अनेक त्रुटी आल्या आहेत. नासानं सुरुवातीला 13 जून रोजी अंतराळवीरांच्या परतीची योजना आखली होती, परंतु अनेक विलंबानंतर, तारीख अनेक वेळा पुढं ढकलली गेली.
हे वाचलंत का :