मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रामदास आठवले यांच्या बॅगांसह हेलिकॉप्टरची तपासणी; पाहा व्हिडिओ - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2024, 7:08 PM IST

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीमुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. तर दुसरीकडं निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील सर्वच नेते, विविध पक्षांचे प्रमुख स्टार प्रचारक राज्यभर फिरत आहेत. एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात त्वरित पोहोचण्यासाठी हे नेते हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या काळात पैशांसह कुठल्याही वस्तूंची ने-आण केली जाऊ शकते. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बॅग तपासणी सुरू केली. असं असताना, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar),  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची बॅगची आणि हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली.

उद्धव ठाकरेंचीही तपासली बॅग : सोमवारी (11 नोव्हेंबर) निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथे शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरेंची बॅग तपासली होती. यावरुन मविआचे नेते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.