हैदराबाद : रामोजी राव यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त, रामोजी ग्रुपने शनिवारी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये 'सबला मिलेट्स-भारत का सुपर फूड'चे लोकार्पण केले. यावेळी, सबाला मिलेट्सच्या संचालक, सहारी चेरुकुरी म्हणाल्या, “सबला हे मिलेट्सच्या पौष्टिकतेचे आणि निरोगी जीवनासाठी वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. हे पारंपरिक भारतीय धान्य आणि आधुनिक पाककृतींमधील अंतर नावीन्यपूर्णतेद्वारे भरून काढत आहे. उत्तम चवीसोबत संतुलित पोषण यातून देण्याचा आमचा दृढ संकल्प दर्शवते. आमचे संस्थापक, रामोजी राव यांच्या जयंतीदिनी ही तृणधान्यांच्या रेसिपीची मालिका सुरू करण्याचा आम्हाला आनंद आहे. कारण आम्ही त्यांच्या निरोगी भारताच्या दूरदर्शी स्वप्नाला यातून श्रद्धांजली अर्पण करतो. सबला हा एक ब्रँड आहे जो अन्न सेवनाच्या पद्धतींमध्ये सकारात्मक आणि पद्धतशीर बदल घडवून आणण्यासाठी, संतुलित पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी चॅम्पियन बनवण्यासाठी समर्पित असेल.”
हा उपक्रम ग्राहकांच्या आरोग्यासाठी रामोजी समूहाच्या वचनबद्धतेमध्ये एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून चिन्हांकित करतो. पोषणाच्या अखंडतेशी तडजोड न करता आधुनिक, आरोग्य-सजग जीवनशैलीसाठी डिझाइन केलेली तृणधान्य-आधारित उत्पादने आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. सबला मिलेट्स आपल्या ग्राहकांसाठी पौष्टिक आणि चवदार उत्पादनांच्या श्रेणीचा प्रचार करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात, विविध राज्यांतील खिचडीपासून ते तृणधान्य-आधारित कुकीज, हेल्थ बार, मंच आणि नूडल्सपर्यंत 45 उत्पादने आणि त्यांचे विविध प्रकार लाँच करण्यात आले आहेत, यातून चांगले पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.
रामोजी राव यांची दृष्टी आणि मूल्ये यातून प्रतिबिंबित होतात. तसंच विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्टता यातून सबला मिलेट्स उच्च-गुणवत्तेच्या, नैसर्गिक स्रोत असलेल्या घटकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करतात. तृणधान्ये, त्यांच्या समृद्ध पौष्टिकतेसाठी ओळखली जातात. तृणधान्ये ही प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक घटकांचे पॉवरहाऊस आहेत, ज्यामुळे ते पौष्टिक अन्न पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी आदर्श आहेत.
लाँचिंगच्या कार्यक्रमात पाहुण्यांना नवीन उत्पादनांची पहिल्यांदाच चव घेण्याचा अनुभव मिळाला. यावेळी सहारी चेरुकुरींचे आकर्षक सादरीकरण आणि त्यानंतर ब्रँड लोगो, ब्रँड फिल्म आणि www.sabalamillets.com या ई-कॉमर्स वेबसाइटचे अनावरण करण्यात आले.
लोकांच्यापर्यंत ही उत्पादने पोहोचावीत यासाठी, सबला मिलेट्सने एक डिजिटल मोहीम देखील सुरू केली आहे. यातून ग्राहकांना तृणधान्यांच्या फायद्यांबद्दल शिक्षित करण्याचा उद्देश आहे. तसंच रेसिपी आणि टिप्ससह दैनंदिन जेवणात सहजतेनं त्याचा कसा वापर करता येईल याची माहिती आहे.
सबाला मिलेट्सची संपूर्ण उत्पादन श्रेणी www.sabalamillets.com या साईटवर त्यांच्या अधिकृत ई-कॉमर्स साइटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल ज्यामुळे ग्राहकांना पौष्टिक तृणधान्य-आधारित पर्यायांमध्ये सोयीस्कर माहिती मिळेल.
सबला मिलेट्स बद्दल थोडक्यात - सबला मिलेट्स, “भारत का सुपरफूड” हा भारताचा उदयोन्मुख ब्रँड आणि रामोजी समूहाचा भाग आहे. तृणधान्य श्रेणीतील 45 नवीन उत्पादने आणि प्रकारांचे अनावरण करणारी ही तृणधान्य प्रकारातील पहिलीच कंपनी आहे जी निरोगी अन्न क्रांतीसाठी सज्ज आहे. रामोजी समुहाचे प्रमुख दिवंगत रामोजी राव यांच्या दूरदृष्टीतून जन्माला आलेले, निरोगी, चवदार, आकर्षक आणि परवडणारे अन्न उपलब्ध करून देण्याचे एक साधे पण शक्तिशाली मिशन आहे. ज्यामध्ये आम्ही जे काही करतो त्यामध्ये तृणधान्य असते. आमचे उद्दिष्ट हे आहे की भारताच्या मध्यभागातील धान्यांचा आधुनिक स्वयंपाकघरांना पुन्हा परिचय करून देणे, शरीर आणि मन या दोहोंना पोषक खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे. आमच्या प्रामाणिक प्रयत्नातून आम्ही याची खात्री देतो की यातील प्रत्येक पदार्थामुळे तुमचे आरोग्य वाढेल आणि तुमच्या तोंडाला चांगलीच तव येईल यात शंकाच नाही. आरोग्य आणि उत्तम चव हे दोन्ही एकाचवेळी देणाऱ्या या तृणधान्याच्या पदार्थांची मालिका खाद्य उत्पादनांमध्ये क्रांती घडवण्यासाठी सबला मिलेट्स सज्ज आहे."