राज ठाकरे पुन्हा उतरले रस्त्यावर, वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका - मुलुंड टोल वाहतूक कोंडी
Published : Feb 3, 2024, 4:04 PM IST
ठाणे MNS President Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा टोलनाक्यांकडं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. नाशिक दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईला जात असताना त्यांना मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडीला सामोर जावं लागलं. टोकनाक्यावर वाहनाच्या लांब रांगा लागल्यामुळं तसंच टोलनाक्यावरील टोल प्रशासनाची वसुली पाहून राज ठाकरे गाडीतून खाली उतरले. राज ठाकरे रस्त्यावर उतरताच सर्व वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नवी मुंबई टोल बुथवर उतरून टोल प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. आज पुन्हा 8:30 च्या सुमारास राज ठाकरेंनी टोल प्रशासनाला सुनावत रांगेत अडकलेल्या वाहनचालकांची सुटका केली आहे. तसंच त्यांनी टोल प्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेणार असल्याचं नाशिकमध्ये बोलताना सांगितलंय.