बालभारती माध्यमिक महाविद्यालयाच्या गेटवर गुजराती पाटी, मनसे आक्रमक - Gujarati language board Balbharti
Published : Feb 21, 2024, 10:19 PM IST
मुंबई- कांदिवली पश्चिमेकडील बालभारती माध्यमिक महाविद्यालयाच्या गेटवर गुजराती बोर्ड लावण्यात आला. यावरून मनसे पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मनसे कार्यकर्त्यांनी आज बुधवार (दि. 21 फेब्रुवारी) रोजी महाविद्यालयाला भेट दिली. महाविद्यालयाच्याबाहेर मराठी बोर्ड लावण्याची मागणी केली. यावेळी मनसे नेते अखिल चित्रे म्हणाले, "रामनवमीच्या दिवशी मराठी बोर्ड लावण्याचं आश्वासन शाळा प्रशासनानं दिलं होतं. हे कॉलेज मुंबई विद्यापीठाकडं नोंदणीकृत आहे. तुम्हाला गुजरातीमध्येच बोर्ड करायचे असेल तर गुजरात विद्यापीठात नोंदणी करा. मग विद्यार्थी येतात का? ते पाहा." काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दोन महिन्यांत दुकानांवर मराठी भाषेत फलक लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता शाळेवरील पाट्यांवरूनही मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे मराठी बोर्डचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.