महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मार्गदर्शी चिट्स, विश्वासाचा ब्रँड आता कर्नाटकात मजबूत; केंगेरी शाखेचा उद्घाटन कार्यक्रम लाईव्ह

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

Updated : 5 hours ago

हैदराबाद : भारतातील सर्वात विश्वासार्ह चिट फंड कंपन्यांपैकी मार्गदर्शी हा विश्वासाचा ब्रँड आहे. मार्गदर्शी आता कर्नाटकातील केंगेरी इथं 119 व्या शाखेचं उद्घाटन करत आहे. याबाबत मार्गदर्शी अभिमानानं या शाखेची घोषणा करत आहे. ही नवीन शाखा कंपनीचा विस्तार वाढवण्यासह विश्वासार्ह वित्तीय सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे.मार्गदर्शी चिट्स फंड कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आपला विस्तार करत आहे. वैयक्तिक तसंच कुटुंबांना त्यांच्या आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवण्यात मार्गदर्शी संस्था कटिबद्ध आहे. याबाबत मार्गदर्शी चिट्स फंडच्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण यांनी आपलं मत व्यक्त केलं. "आमच्या केंगेरी शाखेचं उद्घाटन हे कर्नाटकातील लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आमच्या ध्येयातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मार्गदर्शी चिट्स फंड आमच्या सदस्यांना त्यांचं उद्दिष्ट सहजतेनं साध्य करण्यात मदत करण्यासाठी सुरक्षित, पारदर्शक आणि शिस्तबद्ध बचत पर्याय देण्यासाठी वचनबद्ध आहे." 
Last Updated : 5 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details