श्रीहरिकोटा येथून स्पॅडेक्स मिशनचे यशस्वी प्रक्षेपण - ISRO
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 30, 2024, 10:15 PM IST
|Updated : Dec 30, 2024, 10:43 PM IST
श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज इतिहास रचला आहे. इस्रोने आपले महत्त्वाकांक्षी मिशन PSLV-C60 SpaDeX यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे. या मोहिमेसह, स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानामध्ये प्रभुत्व मिळविलेल्या देशांच्या निवडक क्लबमध्ये भारत सामील झाला आहे. इस्रोने सांगितले की, PSLV-C60 ने स्पॅडेक्स आणि 24 पेलोड्सचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून स्पॅडेक्स आणि नवीन पेलोडसह PSLV-C60 लाँच करण्यात आले आहे. SpaDeX चे पूर्ण नाव Space Docking Experiment आहे. या मोहिमेअंतर्गत इस्रोने चेझर आणि टार्गेट हे दोन उपग्रह अवकाशात पाठवले. या दोन उपग्रहांना जोडून स्पेस डॉकिंगचे प्रात्यक्षिक करण्यात आले. हे तंत्रज्ञान भविष्यात स्पेस स्टेशन्स आणि इतर मोठ्या अंतराळयानांच्या निर्मितीसाठी खूप उपयुक्त ठरेल.
Last Updated : Dec 30, 2024, 10:43 PM IST