Live : मार्गदर्शी चिट फंडची शमशाबाद, हस्थिनापुरममध्ये नवी शाखा - MARGADARSI CHIT FUND
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 16, 2024, 12:29 PM IST
|Updated : Nov 16, 2024, 4:25 PM IST
हैदराबाद : मार्गदर्शी चिट फंड ही संस्था चिट फंड उद्योगातील विश्वासू संस्था असल्याचा लौकिक आहे. तेलंगणामधील वानापार्थी इथं आज मार्गदर्शी चिट फंड आपली 116 वी शाखा सुरू करत आहे. आजपासून ही शाखा जनतेच्या सेवेसाठी समर्पित होईल. मार्गदर्शीच्या एम डी श्रीमती शैलजा किरण या रामोजी फिल्म सिटीमधून वानापार्थी शाखेची सुरुवात करत आहेत. मार्गदर्शी, रामोजी समूहाची प्रमुख कंपनी आहे. तिची स्थापना 1962 मध्ये करण्यात आली असून स्थापनेपासून सहकारी वित्तीय सेवांमध्ये मार्गदर्शी ही अग्रणी संस्था आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मार्गदर्शीच्या शाखांचं मजबूत नेटवर्क आहे. मार्गदर्शी कंपनीनं विश्वास, पारदर्शकता आणि आर्थिक सक्षमीकरणाचा आपला वारसा कायम जपला आहे. या नव्या शाखेचा शुभारंभही या प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.
Last Updated : Nov 16, 2024, 4:25 PM IST