मुंबई/नागपूर- राज्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकाविण्यात येत आहे.
Live Updates
- ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील भिवंडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रध्वज फडकाविला. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकाविला.
- प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान) तिरंगा फडकावून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, मविआ स्थगिती सरकार होते. आदित्य ठाकरेंनी कोस्टल रोडचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. मविआ नसते तर २०२३ मध्येच कोस्टल रोडचे काम पूर्ण झाले असते'.
🕚 11.13am | 26-1-2025📍Mumbai.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 26, 2025
LIVE | Media interaction #Maharashtra #Mumbai https://t.co/ZBgRZjK0L8
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयात महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. यावेळी नागपूरमधील संघाचे पदाधिकारी आणि शेकडो स्वयंसेवक उपस्थित होते.
- मुंबईत, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या झोन ३ च्या परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात डीसीपी जयंत बजबळे यांनी राष्ट्रध्वज फडकाविला. या कार्यक्रमात विविध पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि स्थानिक शाळांमधील विद्यार्थीदेखील उपस्थित राहिले. समारंभात, डीसीपींनी पोलिस आणि नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा-