विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोण आघाडीवर? जाणून घ्या, राजकीय अन्वयार्थ - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 23, 2024, 10:36 AM IST
|Updated : Nov 23, 2024, 12:13 PM IST
हैदराबाद - राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाचे निकाल आज लागणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी (एसपी) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) असे पक्ष आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. ही निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय अस्तित्व पणाला लावणारी ठरणार आहे. महायुतीकडून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावं चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत. महायुतीसह महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे.
Last Updated : Nov 23, 2024, 12:13 PM IST