मुंबई : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक बसेसनी मुंबईसह 250 दशलक्ष किमीचा टप्पा ओलांडलाय. टाटा मोटर्सच्या 3 हजार 100 इलेक्ट्रिक बसेस 10 शहरांमध्ये सुरक्षित, आरामदायी सेवा प्रदान करताय. या बसेसनं एकत्रितपणे 250 दशलक्ष किमी पेक्षा जास्त अंतरचा प्रवास केलाय. म्हणजे हे एव्हढं अंतर आहे, की या अंतरात पृथ्वीभोवती 6 हजार 200 वेळा प्रदक्षिणा घालता येतील.
1.4 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी
दररोज सरासरी 200 किमी अंतर कापून, ई-बसनी प्रत्येक शहरात वायू प्रदूषण कमी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देताय. एकत्रितपणे, टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्यानं 250 दशलक्ष किमी प्रवास केलाय. यातून जवळजवळ 1.4 लाख टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी झालंय.
शून्य-उत्सर्जन
याबाबत टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्युशन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) असीम कुमार मुखोपाध्याय म्हणाले, “आमच्या आधुनिक शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्यानं 250 दशलक्ष किमी अंतर कापण्याचा हा टप्पा गाठल्यामुळं आम्हाला आनंद होत आहे. गेल्या 12 महिन्यांत 150 दशलक्ष किमी अंतर कापण्यात आलंय. आम्हाला प्रवाशांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानतो.” टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक बसेस आधुनिक वाहतुकीला शाश्वत, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम पर्याय देतात. या बसेस दररोज मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, जम्मू, श्रीनगर, लखनऊ, गुवाहाटी आणि इंदूरमधील लाखो प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित प्रवास देतात.
बसमधील वैशिष्ट्ये
प्रत्येक टाटा मोटर्स इलेक्ट्रिक बसमध्ये आरामदायी प्रवासासाठी वापरण्यास सोपे एअर सस्पेंशन, अपंग प्रवाशांसाठी सहज उपलब्ध असलेल्या हायड्रॉलिक लिफ्ट आणि आरएस आणि एर्गोनॉमिक सीटिंग सारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह येतात. 9-मीटर आणि 12-मीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असलेल्या या इलेक्ट्रिक बसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत कार्यक्षमतेचा सहज मेळ घालण्यात आला आहे.
या शहरांमध्ये धावतात टाटा बसेस
टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक बसेस लखनऊ आणि इंदूर व्यतिरिक्त मुंबई, बेंगळुरू, नवी दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, श्रीनगर, जम्मू, गुवाहाटी शहरात धावताय.
इलेक्ट्रिक बसेसची वैशिष्ट्ये
टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक बसेसमध्ये हायड्रॉलिक लिफ्ट, एअर सस्पेंशन आणि अपंगांसाठी एर्गोनॉमिक सीटिंग अशी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, प्रगत तंत्रज्ञान असलेल्या या इलेक्ट्रिक बसेस उत्कृष्ट कामगिरी करताय. केवळ व्यावसायिक वाहनंच नाही, तर प्रवासी वाहनातही टाटा मोटर्सची पकड मजबूत आहे.
हे वाचलंत का :
12 राज्यांमध्ये 5738 PM E Bus ला मान्यता, महाराष्ट्रातील 'या' शरहता धावणार PM E Bus