मुंबई : गृह मंत्रालयानं 25 जानेवारी 2025 रोजी पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली होती. हा सन्मान त्या व्यक्तीचा करण्यात येणार आहे, ज्यांनी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलं आहे. या यादीत चित्रपट निर्माते, अभिनेते, संगीतकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये देण्यात आला आहे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. त्यापैकी सात जणांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे, जो भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो. तर 19 व्यक्तींना पद्मभूषण आणि 113 व्यक्तींना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात येईल. हा सन्मान कला, विज्ञान, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दिला जात असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मार्च-एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रपती भवनात विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान करतील.
पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित व्यक्तींची नावे
- प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्यांचे 2024 मध्ये निधन झालं. छठ पूजा गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शारदा सिन्हा यांना भारतीय संगीतातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. तसेच हा सन्मान मरणोत्तर असणार आहे.
- मल्याळम साहित्यातील महान लेखकांपैकी एक एम.टी. वासुदेवन नायर यांना गेल्या डिसेंबरमध्ये त्याच्या निधनाच्या एका महिन्यानंतर पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
Congratulations to all the Padma awardees! India is proud to honour and celebrate their extraordinary achievements. Their dedication and perseverance are truly motivating. Each awardee is synonymous with hardwork, passion and innovation, which has positively impacted countless…
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2025
President Droupadi Murmu has approved the conferment of 139 Padma Awards, including one duo case (a duo case is counted as one award).
— IANS (@ians_india) January 25, 2025
The list comprises 7 Padma Vibhushan, 19 Padma Bhushan and 113 Padma Shri Awards. 23 of the awardees are women and the list also includes 10… pic.twitter.com/yRuITKk4Sc
'या' सेलिब्रिटींना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला
दुव्वुर नागेश्वर रेड्डी - वैद्यकशास्त्र
न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह खेहर - सार्वजनिक व्यवहार
कुमुदिनी रजनीकांत लाखिया - कला
लक्ष्मीनारायणन सुब्रमण्यम - कला
एम.टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर) - साहित्य आणि शिक्षण
ओसामु सुझुकी (मरणोत्तर) – व्यापार आणि उद्योग (जपान)
शारदा सिन्हा (मरणोत्तर) - कला
'या' सेलिब्रिटींना पद्मभूषण पुरस्कार मिळाला
नंदमुरी बालकृष्ण - तेलुगू चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल
अजित कुमार - तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता
अनंत नाग - कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्गज
शेखर कपूर - चित्रपट निर्माते
पंकज उदास - दिग्गज गझल गायक
शोभना चंद्रकुमार - कला
पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झालेले सेलिब्रिटी
अरिजित सिंग - प्रसिद्ध पार्श्वगायक
रिक्की केज- ग्रॅमी पुरस्कार विजेता संगीतकार
ममता शंकर - अभिनेत्री आणि नर्तिका
जसपिंदर नरुला - पार्श्वगायिका
पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन : सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, 'सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन! त्यांच्या असाधारण कामगिरीचा सन्मान आणि उत्सव साजरा करताना भारताला अभिमान आहे. त्याचे समर्पण आणि चिकाटी खरोखरच प्रेरणादायी आहे. प्रत्येक पुरस्कार विजेता हा कठोर परिश्रम आणि उत्कटतेचा समानार्थी आहे, ज्यानं अनेकांचे जीवन उजळवले आहे. हे सेलिब्रिटी आपल्याला निःस्वार्थपणे समाजाची सेवा करण्याचे मूल्य शिकवतात.' आता मोदींच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून या नामांकित व्यक्तीचं अभिनंदन करत आहेत.