मुंबई - अभिनेता अक्षय कुमार आणि वीर पहाडिया स्टारर 'स्काय फोर्स' चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करत आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 12.25 कोटीची कमाई केली आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 21.50 कोटीचं कलेक्शन केलं आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 33.75 कोटी झालं आहे. 'स्काय फोर्स' हा चित्रपट 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पहिल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अक्षयनं आहुजाची भूमिका साकारली आहे. तसेच टी. विजयाची भूमिका अभिनेता वीर पहाडियानं साकारली आहे.
'स्काय फोर्स'बद्दल अक्षय कुमारनं केली होती पोस्ट : या चित्रपटात सारा अली खान, निमरत कौर आणि शरद केळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान 'स्काय फोर्स' रिलीजपूर्वी अक्षयनं एक फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, 'मी 150 हून अधिक चित्रपटांचा भाग आहे, पण सत्यकथेवर आधारित या शब्दांमध्ये काहीतरी अद्वितीय ताकद आहे. तसेच त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या गणवेश परिधान करणं हे अविश्वसनीय आहे. 'स्काय फोर्स' ही सन्मान, धैर्य आणि देशभक्तीची एक अनकहीत कहाणी आहे, जी शेअर करायला हवी. उद्यापासून चित्रपटगृहात पाहा!'
वीर पहाडियाचं नशीब चमकेल का? : दरम्यान वीर पहाडियाचा हा चित्रपट पहिला आहे. या चित्रपटामधून तो स्वत:चं नशीब चमकवेल असं सध्या दिसत आहे. तसेच या चित्रपटातील वीरच्या अभिनयाचेही खूप कौतुक झालं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला तर वीर पहाडियाला बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याची संधी मिळेल. आता रविवारी हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे महत्वाचे आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि या निमित्तानं बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलं कलेक्शन करेल अशी अपेक्षित आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटाचा बजेट 160 कोटी रुपयांचा आहे. दरम्यान या चित्रपटाची तुलना हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'फायटर'शी होऊ लागली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सुमारास 'फायटर' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. 'फायटर'नं जगभरात सुमारे 358.83 कोटी रुपये कमावले होते.
हेही वाचा :