महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बीड जिल्ह्यात सर्व सीमा सील, पोलिसांचा तगडा बंदोबस्त - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 8:28 PM IST

बीड Maratha Reservation : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत थेट त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील 'सागर' बंगल्यावर जाण्यासाठी निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे माघारी फिरले आहेत. जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला आहे. तसंच या संदर्भात माध्यमांशी बोलताना, शहाणी भूमिका घेऊन परत जात असल्याचं ते म्हणालेत. या निर्णयानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यापूर्वी बीडमध्ये झालेल्या मराठा आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता बीडच्या बाॅर्डरवर तगडा बंदोबस्त करण्यात आलाय. बीडमध्ये 38 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून बीड जिल्ह्यात 37 (1) हे कलम लावण्यात आले आहे. त्यामुळं कुठल्याही आंदोलकांनी परवानगीशिवाय आंदोलन केले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. 

ABOUT THE AUTHOR

...view details