पंढरपूरमधील चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा; पाहा व्हिडिओ - Pandharpur
Published : Jul 27, 2024, 2:23 PM IST
पंढरपूर Temples Surrounded By Water : मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक धरणांची पाणलोट क्षेत्रं भरली आहेत. नीरा खोऱ्यात देखील दमदार पाऊस झाल्यामुळं वीर धरण शंभर टक्के भरलंय. त्यामुळं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वीर धरणातून तब्बल 64 हजार क्युसेक विसर्ग निरा नदीमध्ये सोडण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी वीर धरणातून सोडलेलं पाणी आज (27 जुलै) अकलूज संगम मार्गे पंढरपूरमध्ये पोहोचलं. यामुळं पंढरपूरमधील ऐतिहासिक असणारा जुना दगडी पूल पाण्याखाली गेला. तर चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा घातलाय. दरम्यान, काही महिला भाविक चंद्रभागेची हळदी कुंकू तसंच खणा नारळानं ओटी भरत असून भीमा नदीचं पाणी हे घाटाच्या पायऱ्यास लागल्यानं भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत आहे.