अनाथ मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा; अन् मुलांनी मारला आंब्यावर ताव... - Mango Eating Competition - MANGO EATING COMPETITION
Published : May 19, 2024, 9:58 PM IST
पुणे Mango Eating Competition : उन्हाळा म्हटलं की, सर्वांना आंब्याची आठवण येते. जरी उन्हाळा हा त्रासदायक असला तरी, या ऋतूत आपल्याला आंबा (Mango) खायला मिळतो. फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात दाखल झाला असून आंबा खाण्यासाठी लोक सध्या बाजारात मोठी किंमत देत आहेत.अश्यातच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीनं माहेर या संस्थेतील अनाथ मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी जवळपास 100 हून अधिक मुलांनी मनसोक्तपणे आंबे खाण्याचा आनंद लुटला. अनाथ मुलांना विकत घेऊन आंबे चाखता येणार नाहीत, याचा विचार करुन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. अनाथ मुला-मुलींनी आंबे खाण्याचा आनंद लुटला. यावेळी परदेशी नागरिकांनी देखील आंबे खाण्याचा आनंद घेतला.