महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

35 टक्के काठावर पास! विद्यार्थ्यांनं सर्व विषयांमध्ये मिळवले परफेक्ट 35 गुण, केक कापून आनंद साजरा - Maharashtra SSC Result - MAHARASHTRA SSC RESULT

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 7:16 AM IST

जालना 35 Percent in 10th Board Exam : दहावीच्या निकालात कमी गुण मिळाल्यानं  विद्यार्थ्यांसह पालक निराश होतात. मात्र, जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यानं ३५ टक्के मिळाल्यानंतरही कुटुंबाकडून आनंद साजरा करून विद्यार्थ्याला प्रोत्साहित करण्यात आलं. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्यानं दहावीच्या प्रत्येक विषयात 35 गुण मिळवले आहेत. या अजब-गजब विक्रमामुळं सध्या हा विद्यार्थी खूप चर्चेत आहे. रविंद्र साईप्रसाद खेडकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. दहावीत पास झाल्यावर त्याच्या आजीनं त्याला थेट मोबाईल फोन भेट म्हणून दिलाय. तसंच त्याच्या या निकालामुळं कुटुंब आणि मित्रांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. रविंद्रच्या घरातील मंडळींनी त्याचं औक्षण करत त्याचं अभिनंदन केलं. तर त्याच्या मित्रांनी केक कापून त्याचं जल्लोषात स्वागत केलंय. त्यामुळं सध्या जालन्यात रविंद्रनं मिळवलेल्या 35 टक्क्यांचीच अधिक चर्चा होत असल्याचं बघायला मिळतंय. 

ABOUT THE AUTHOR

...view details