"मी संधीसाधू, तर मग शरद पवार कोण?", 'त्या' वक्तव्यावरुन अशोक चव्हाणांचा सवाल
Published : Nov 11, 2024, 7:45 AM IST
नांदेड : लोकसभा निवडणुकीवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभा सदस्यत्व देण्यात आलं. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेवरुन अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. दरम्यान, या टीकेला आता अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, "शरद पवार नेमकं काय म्हणाले हे मला माहिती नाही. मात्र, ते खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या लहान माणसावर वक्तव्य केलं असेल असं मला वाटत नाही. परंतु, मी जर संधीसाधू आहे, तर मग शरद पवार काय आहेत? या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल", असा पलटवार अशोक चव्हाण यांनी केला. तसंच पुढं ते म्हणाले, "महाविकास आघाडीत ताळमेळ राहिलेला नाही. त्यामुळं यांचा नुसता गोंधळ चाललाय. असाच गोंधळ राज्यपातळीवर झाला तर, आपण राज्याचा काय विचार करणार", असा टोलाही चव्हाणांनी लगावला.