विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; पोलीस आयुक्त म्हणाले... - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 23, 2024, 11:12 AM IST
मुंबई : राज्यासह मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Maharashtra Assembly Election Result Vote Counting) आज (23 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत अनेक मतदार संघामध्ये काटे की टक्कर होणार असल्यानं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मुंबईभर आढावा घेत आहेत. विवेक फणसाळकर यांनी मुंबईतील माहीम मतदार संघातील मतमोजणी केंद्राला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना विवेक फणसाळकर म्हणाले की, "मुंबईत सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आमचा हा बंदोबस्त आज दिवसभर आणि रविवारीही (24 नोव्हेंबर) असेल. विजयी मिरवणुकीवर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, त्यांना नियमांचं पालन करावं लागेल. तसंच संवेदनशील भागामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे", असं त्यांनी सांगितलं.