Health Benefits Of Curd: आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जेवणासोबत दही खाणं आवडते. दही नसल्यास त्यांना जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. नियमित दही खाल्लास ताजेतावने वाटते शिवाय चयापचय देखील सुरळीत होतो. तसंच पोटाच्या समस्या, ऑस्टिओपोरोसिस, केस, रक्तदाब आणि हाडांचे आरोग्य चांगलं राहते. दह्यामध्ये व्हिटॅमिन बी6 आणि 12 कॅल्शियम, प्रथिने, राइबोफ्लेविन यासारखे पोषक घटक आढळतात. दही तेवळ आरोग्यासाठीच नाही तर, सौंदर्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्वचा कोमल करण्यापासून ते केसातील कोंड्यापर्यंत दह्याचा उपयोग होतो.
- हाडे आणि दातांसाठी चांगलं: पोषणतज्ञ डॉ. लहरी सुरपाणे यांनी सांगितलं की, दह्यातील कॅल्शियम आणि फॉस्परस हाडांच्या मजबुतीसाठी चांगलं आहे. दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेली कॅल्शियमसारखी खनिजे दह्यामध्ये उपलब्ध आहेत. यामुळे संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव होतो.
- हृदयाचे आरोग्य सुधारते: दही खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन हृदय निरोगी राहते, असं तज्ञांचं म्हणणं आहे. तसंच दही रक्तप्रवाह नियंत्रित करते आणि हृदयविकारांना प्रतिबंध करते हे देखील स्पष्ट झालं आहे.
- वजन कमी करण्यासाठी: ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात दह्याचा समावेश करावा असं तज्ञ सांगतात. यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. त्यात असलेले उच्च प्रथिने दीर्घकाळापर्यंत उपासमार टाळतात, परिणामी, आपण कमी अन्न घेतो.
- योग्य पचन: दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स योग्य पचनास मदत करतात असं तज्ञांचं म्हणणं आहे. दही पचनक्रिया गतिमान करते आणि अन्नातील पोषक द्रव्ये शरीराला जलद उपलब्ध करून देते. बद्धकोष्ठता, जुलाब आणि फुगणे यापासून बचाव करण्यासाठी दही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही समोर आलं आहे.
- रोगप्रतिकारक शक्तीसाठी: तज्ञांचे म्हणणे आहे की, दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. जो मानवी शरीराला आवश्यक प्रतिकारशक्ती प्रदान करते. तसंच दही शरीराची ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढवते आणि चयापचय सुधारते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि इतर आजारांशी लढण्याची ताकद वाढते.
- केसांचे आरोग्य: दह्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे आणि लॅक्टिक ऍसिड केसांच्या रोमांना मजबूत करतात. परिणामी, केस गळत नाहीत. तसंच केस मजबूत होतात. त्वचेच्या काळजीसाठीही दही उपयुक्त आहे. व्हिटॅमिन ई आणि झिंक सारख्या पोषक तत्वांमुळे त्वचा चमकदार आणि निरोगी बनते.
- मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम: तज्ञ सांगतात की दही हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम औषध म्हणून काम करते. याचं सेवन केल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे ग्लुकोजची पातळीही स्थिर राहते आणि साखर नियंत्रणात राहते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)