ETV Bharat / state

किरकोळ वाद विकोपाला! महिलांनी डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणाची केली हत्या

डोळ्यात मिरची पूड टाकून तसंच शस्त्रानं वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं.

NASHIK MURDER CASE
नाशिकमध्ये हत्या झालेला तरुण (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2024, 6:13 PM IST

Updated : Nov 25, 2024, 7:59 PM IST

नाशिक : किरकोळ वादातून काही महिला व पुरुषांनी तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून, शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात असलेल्या अमृतधाम कामगारमध्ये काल (24 नोव्हेंबर) रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. विशांत भोये असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत आडगाव पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं. मात्र, घडलेल्या या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

तरुणाची केली हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विशांत भोये हा आपल्या कुटुंबासमवेत पंचवटी अमृतधाम विडी कामगार नगर येथे राहत होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा परिसरातील काही मुलांसोबत वाद झाला. काल रात्री साडेदहाच्या सुमारास कामगार नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ विशांत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी त्या ठिकाणी अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी विशांत आणि त्याच्या मित्रांच्या डोळ्यात आधी मिरचीची पूड टाकली, त्यानंतर सात जणांच्या टोळक्यानं विशांतवर हल्ला केला. यातील एका संशयितानं विशांतवर वार केल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला तत्काळ रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

नाशिकमध्ये किरकोळ वादातून तरूणाची हत्या (Source - ETV Bharat Reporter)

किरकोळ वाद विकोपाला : घडलेल्या घटनेच्या दोन दिवसापूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून झालेला हा वाद विकोपाला गेला होता. त्यातून हा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी सात जणांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं. इतर पाच जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा

  1. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातील अनेकांना लागू शकते मंत्रिपदाची लॉटरी, वाचा कोणती नावं चर्चेत...
  2. आगामी महापालिका निवडणूक ठाकरे गटासाठी प्रतिष्ठा अन् अस्मितेची लढाई; ठाकरेंचा करिष्मा चालणार का?
  3. एक महिना थांबा, मराठा काय आहेत ते कळेल! पत्रकारांवर टोलेबाजी करत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

Last Updated : Nov 25, 2024, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.