ETV Bharat / entertainment

हेमा मालिनी यांनी इस्कॉन मंदिरातील फोटो केले शेअर, उद्घाटन होईल 'या' दिवशी... - HEMA MALINI

हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर इस्कॉन मंदिरातील सुंदर फोटो शेअर केली आहेत. यात त्यांनी इस्कॉन मंदिरचं कधी उद्घाटन होईल याबद्दल देखील सांगितलं आहे.

Hema Malini
हेमा मालिनी (Hema Malini - instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 2, 2025, 1:34 PM IST

मुंबई - दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी या अनेकदा मंदिरामध्ये भेट देत असतात. दरम्यान त्यांनी खारघर, नवी मुंबई येथील इस्कॉन मंदिरामधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यामध्ये त्या खूप आनंदी असल्याच्या दिसत आहे. या फोटोच्या पोस्टमध्ये त्यांनी एक लांबलचक नोट देखील शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं, 'खारघर, नवी मुंबई येथे काहीतरी सुंदर घडत आहे. माझ्या मनाच्या अगदी जवळ, इस्कॉननं एक अप्रतिम सुंदर मंदिर बांधलं आहे, जिथे प्रमुख देवता राधा मदनमोहन आहेत.'

हेमा मालिनी यांनी शेअर केले फोटो : यानंतर हेमा मालिनी यांनी पुढं लिहिलं, 'हे सर्व सूरदास प्रभूंच्या अथक परिश्रमाचे,अनेक भक्तांचे आणि कारीगरांचे आभार आहे, ज्यांनी हे मंदिर प्रत्यक्षात आणण्यासाठी 10 वर्षे परिश्रम घेतले. मी नवीन वर्षाच्या दिवशी खारघरला प्रणाम करायला गेले होते आणि मला खूप समाधान वाटले! मंदिराचे उद्घाटन 15 जानेवारी 2025 रोजी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होणार आहे.' यापूर्वी हेमा मालिनी यांनी स्वच्छता मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी काढलेल्या रॅलीमध्ये देखील सहभाग घेतला होता. त्यांनी या रॅलीमधील काही सुंदर फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केली होती .

हेमा मालिनी यांची राजकीय कारकीर्द : दरम्यान हेमा मालिनी यांच्या राजकीय कारकीर्दबद्दल बोलायचं झालं तर त्या सलग तिसऱ्यांदा मथुरा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. यापूर्वी, त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, आपली मथुरा लोकसभा जागा ही खूप चांगल्या मतानं जिंकली होती. हेमा मालिनी यांना 6,71,283 मते मिळाली होती. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी कुंवर नरेंद्र सिंह यांना 3,77,822 मते मिळाली होती. हेमा मालिनी यांनी कुचीपुडीचा अभ्यास केला आहे. त्यांनी तुलसीदासांच्या 'रामचरितमानस'मध्ये नरसिंह आणि रामासह अनेक नृत्य भूमिका केल्या आहेत. हेमा मालिनीला 2000 मध्ये पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवाय त्यांना भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. तसेच त्यांना त्यांच्या डान्ससाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा :

  1. महिला चाहतीच्या स्पर्शानं 'ड्रीमगर्ल' अस्वस्थ, हेमा मालिनींचा त्रागा... ''हात नका ठेऊ" - hema malini and lady
  2. हेमा मालिनीच्या मथुरेतील हॅट्रिकनंतर पाहा काय म्हणतेय ईशा देओल... - mathura lok sabha election
  3. ईशा देओलनं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 44वा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा - DHARMENDRA HEMA WEDDING ANNIVERSARY

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.