ETV Bharat / state

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दिल्लीत चर्चा; सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडतात? सुप्रिया सुळे यांचा सवाल - DESHMUKH MURDER CASE

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळं राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. आज सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

Deshmukh Murder Case
सुप्रिया सुळे आणि संतोष देशमुख प्रकरणा (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2025, 9:14 PM IST

पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "मला एक गोष्ट आश्चर्याची वाटते की, जे अटक होत आहेत ते पुण्यातूनच का होत आहेत? आणि हे चॅनेलवर दाखवण्यात आलं आहे. यामुळं याबाबत पोलिसांनी व्हेरिफिकेशन द्यायला हवं की नक्की काय चाललं आहे. ही फक्त राज्याची बातमी नाहीतर याची चर्चा आता दिल्लीतही होत आहे. दिल्लीतील अनेक खासदार तसंच विचारवंतांचे फोन येत आहेत. नक्की महाराष्ट्रात काय चाललंय? याबाबत देशात अस्वस्थता आहे. यामुळं राज्य सरकारनं याबाबत पारदर्शक माहिती दिली पाहिजे". खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर होत्या त्यावेळी त्या बोलत होत्या.

पालकमंत्र्यांबाबत पहिल्यांदाच अशी चर्चा : पालकमंत्री पदाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडून आल्यानंतर सरकार बसलं आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. पण पालक मंत्र्यांबाबत पहिल्यांदाच मी अशी चर्चा ऐकली आहे. अनेकवेळा सत्ता येते पण पालकमंत्री पदाबाबत अशी चर्चा ही राज्याच्या हिताची नाही. सरकारला एवढं मोठं बहुमत मिळालं आहे तरीही सगळ्याच गोष्टी उशिरा होत आहेत. अनेक मंत्र्यांनी चार्ज घेतलेला नाही.

प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे (ETV Bharat Reporter)

संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणांमध्ये निर्णय घ्यावा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे परभणी आणि बीड प्रकरणात न्याय दिला पाहिजे. संवेदनशीलपणा दाखवल पाहिजे. राजकरण बाजूला ठेवून कारवाई झाली पाहिजे. - सुप्रिया सुळे, खासदार

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अपेक्षा : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्याबाबत सुळे म्हणाल्या, "मी अगोदर ही याबाबत बोलले होते कालही बोलले आहे हे अपेक्षित होतं. हे मी सातत्याने बोलत होते. आता सरकार आलं असून मला आरोप करायचे नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. ते महत्त्वाच्या पदावर बसले आहेत. राज्याचा फिस्कल डिपॉझिट रिपोर्ट पाहा, कधी तरी पॉलिसीवर बोललं पाहिजे. डीपीडीसीचे पैसे वळवले जात आहेत. महिलांची फसवणून होत आहे"

हेही वाचा -

  1. संतोष देशमुख हत्याकांड; परभणीत हजारो नागरिकांचा मोर्चात सहभाग, मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल
  2. संतोष देशमुख हत्याकांड : अखेर सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंना ठोकल्या बेड्या, पोलिसांच्या केलं हवाली
  3. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी; रोहित पवारांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.