मुंबई : बीड सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात विरोधकांकडून विविध आरोप करण्यात येत आहेत. बीड खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्यावरु विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव टाकणं सुरू केलं. मात्र या सगळ्या प्रकरणावर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. मारेकऱ्यांना फासावर चढवणं ही आमची मागणी आहे. हे प्रकरण फास्ट्रॅकवर चालवण्यात यावे, अशी मागणी मी केली आहे, असं त्यांनी आज माध्यमांना बोलताना सांगितलं. विरोधकांनी राजीनामा मागितला, मात्र मी राजीनामा का द्यावा, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याची आमची मागणी : मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावर भाष्य केलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कोणी मारेकरी असतील, त्यांना फासावर लटकावण्यात यावं, "हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, बीड हत्या प्रकरणी आरोपींना फासावर लटकवण्यात यावं, अशी मागणी मी पहिल्या दिवसापासून करत आहे. या हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. हत्या प्रकरण तीन वेगवेगळ्या पद्धतीनं तपासलं जाणारं आहे. पोलीस तपास करत आहेत, सीआयडी तपास करत आहे आणि सरकारनं एसआयटी नेमून या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे बीड हत्या प्रकरणातील मारेकरी सुटणार नाहीत. या प्रकरणी मी राजीनामा का द्यावा," असा सवाल यावेळी त्यांनी केला.
हेही वाचा :
- संतोष देशमुख हत्याकांड : धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, अंजली दमानिया आक्रमक, म्हणाल्या 'आक्रोश मोर्चा केवळ राजकीय'
- "वाल्मिक कराड निकटवर्तीय असल्यानं मुंडेंनी राजीनामा द्यावा", आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टचं सांगितलं
- संतोष देशमुख हत्या प्रकरण: खाते वाटपापूर्वीच धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? सुरेश धस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर