रायपूर : महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडच्या कोरागुट्टा या नक्षलवाद्यांच्या गडात जवानांनी आपला तळ ठोकला आहे. जवानांनी कोरागुट्टा या नक्षलवाद्यांच्या गडाट 31 डिसेंबरला नवीन कँप उघडून नवीन वर्षाची सुरुवात जल्लोषात केली. जवानांनी मागील 25 वर्षापासून बंद असलेला विजापूर तारेम कोंडापल्ली पामेड हा रस्ता मोकळा केला आहे. कोरागुट्टा हा परिसर नक्षलवाद्यांच्या पीएलजीए बटालियनच्या मुख्य भागात येते. त्यामुळे सुरक्षा दलातील जवानांनी कोरागुट्टा परिसरात तळ ठोकल्यानं हे मोठं यश मानलं जात आहे.
कोरागुट्टा नक्षलवाद्यांच्या पीएलजीए बटालियन क्रमांकचे मुख्य क्षेत्र : सुरक्षा दलातील जवानांकडून सध्या बस्तरमध्ये मोठी कारवाई करण्यात येत आहे. 2026 ची तयारी सुरू होणार आहे. नवीन वर्षाच्या दिवशी विजापूरमधील नक्षलद्यांच्या पीएलजीए बटालियन क्रमांक 1 चे मुख्य क्षेत्र कोरागुट्टा इथं सुरक्षा दलांचा कॅम्प उघडण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांसह सामान्य नागरिकांनाही जाणं धोकादायक होतं. मात्र आता सुरक्षा दलाच्या जवानांनी थेट कोरोगुट्टा इथंच आपला तळ ठोकला आहे.
25 वर्षांपासून बंद रस्ता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केला मोकळा : कोरागुट्टा इथं 31 डिसेंबरला नवीन कँपची स्थापना करण्यात आली. नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या कोरागुट्टा इथल्या कँपमुळे 25 वर्षांपासून बंद असलेल्या विजापूर-तारेम-कोंडापल्ली-पामेड रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. कोरागुट्टा हे नक्षलवाद्यांच्या पीएलजीए बटालियनच्या मुख्य भागात येते. छत्तीसगड सरकारच्या नियाद नेल्लानार योजनेंतर्गत इथं शिबिराची स्थापना करण्यात आली.
नागरिकांना मिळणार विविध सरकारी सुविधा : नक्षलवाद्यांच्या गडात सुरक्षा दलानं तळ ठोकल्यानं आता या परिसरातील आदिवासी नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळमार आहे. या परिसरात राहणाऱ्या आदिवासी नागरिकांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा आणि मूलभूत सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या कँपच्या स्थापनेनंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वैद्यकीय पथकानं वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं. या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी केली. गावकऱ्यांना मोफत औषध वाटप केलं. कोरागुट्टा इथं सुरक्षा दलाच्या जवानांचा कँप सुरू झाल्यानं इथले नागरिक खूप उत्साहित आहेत.
अंतर झालं 110 किमीनं कमी : कोरागुट्टा इथं नक्षलवाद्यांचा गड असल्यानं या मार्गावर कोणी जात नव्हतं. मात्र आता सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसरात तळ ठोकल्यानं नागरिकांचं धाडसं वाढलं आहे. विजापूरहून पामेडला जाण्यासाठी सर्वसामान्यांना तेलंगणातील चेर्ला मार्गे सुमारे 210 किमी अंतर कापावं लागत होतं. परंतु विजापूर-तारेम-कोंडापल्ली-पामेड रस्ता सुरू झाल्यानं हे अंतर कमी झालं नक्षलवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी, राकेश अग्रवाल पोलीस महानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस रायपूर सेक्टर, कमलोचन कश्यप, पोलीस उपमहानिरीक्षक दंतेवाडा, सूरजपाल वर्मा डी एस नेगी कारेपू ऑप्स सेक्टर विजापूर आणि जितेंद्र कुमार यादव पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस ऑपरेशन सेक्टर कोंटा बिजापूर, राजीव कुमार कमांडंट 151 कॉर्प्स सेंट्रल रिझर्व्ह पोलीस यांच्या निर्देशानुसार हा कँप उघडण्यात आला आहे.
हेही वाचा :