महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पाहा, करीना कपूर आणि प्रीती झिंटाचा कॅज्युअल एअरपोर्ट लूक - Kareena Kapoor Airport Look - KAREENA KAPOOR AIRPORT LOOK

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 5:51 PM IST

मुंबई - करीना कपूर खान आणि प्रीती झिंटा यांना बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. दोघीही केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही तर त्या त्यांच्या स्टाईलसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या फॅशन सेन्समुळे प्रेक्षक नेहमीच त्यांच्यावर मोहित झाले आहेत. शनिवारी दोघीही स्वतंत्रपणे मुंबई विमानतळावर दिसल्या. अर्थातच त्यांनी परिधान केलेले ड्रेस आणि त्यांच्या एअरपोर्ट लूकची चर्चा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.  

दोन्ही अभिनेत्री फॅशन जगतात तरंग निर्माण करत असताना, त्या आपापल्या व्यावसायिक कमिटमेंटमध्येही गुंतलेल्या आहेत. करीना अलिकडेच क्रू चित्रपटात झळकल्यानंतर आता आगामी सिंघम अगेन आणि द बकिंगहॅम मर्डर्ससह अनेक चित्रपटातून काम करत आहे. दरम्यान, प्रीती झिंटाने सनी देओल स्टारर लाहोर 1947 या बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने निर्मित चित्रपटासाठीचे शूटिंग सुरू केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details