महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

खेलो इंडिया विंटर गेम्सच्या तयारी सुरू असतानाच काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी; पाहा व्हिडिओ - काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 6:10 PM IST

श्रीनगर Snowfall In Kashmir : काश्मीरमध्ये 21 फेब्रुवारीपासून खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा होणार आहेत. पण अचानक बर्फवृष्टी झाल्यानं खेळाडूंसोबतच प्रेक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज (18 फेब्रुवारी) काश्मीर खोऱ्यातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाली. यासोबतच उत्तरेकडील मैदानी भागात हलका पाऊस झाला आहे.  त्यामुळं काही महत्त्वाचे आंतरजिल्हा रस्ते बंद झाले आहेत. खेलो इंडिया विंटर गेम्स 2024 च्या चौथ्या आवृत्तीचा पहिला टप्पा लडाख केंद्रशासित प्रदेशात पार पडला. तर त्याची दुसरी आवृत्ती काश्मीरमधील पर्यटन स्थळ गुलमर्ग येथे आयोजित केली जाणार आहे. 21, 22 फेब्रुवारी दरम्यान येथे विविध खेळांचं आयोजन करण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये स्की पर्वतारोहण, अल्पाइन स्कीइंग, स्नोबोर्डिंग, नॉर्डिक स्की आणि गोंडोला यासारखे मजेदार खेळ आयोजित केले जातील.  या प्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्की-रिसॉर्ट गुलमर्गसह डोंगराळ भागात मध्यम हिमवृष्टी झाली आहे. गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग, गुरेझ, माचिल, बांदीपोरामधील तंगदार आणि केरन या इतर डोंगराळ भागातही आज सकाळपासून मध्यम हिमवृष्टी झाली. संध्याकाळपर्यंत ही बर्फवृष्टी वाढेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.  चार दिवसांनी हवामानात बदल होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details