महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

लोकशाहीत सगळ्यांना काळे झेंडे दाखवण्याचा अधिकार : छगन भुजबळ - मराठा आंदोलक

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 5:33 PM IST

मनमाड Chhagan bhujbal On Maratha reservation : प्रत्येकाला लोकशाहीत काळे झेंडे दाखवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे याबाबत मी बोलणार नाही. मात्र, मराठा आंदोलक नाही, तर तेथील स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर धमकी दिली की, "छगन भुजबळ कुटुंबातील कोणीही इथं आलं तर त्यांचे हातपाय तोडू. हे आक्षेपार्ह आहे. याचा पोलिसांनी शोध घ्यावा आणि कारवाई करावी," अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. मनमाड इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आयोजित बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ते मनमाडला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. "मतदान जेव्हा असेल, तेव्हा तुम्हाला जे करायचं ते करा. मात्र, आता अशी भाषा वापरणं योग्य नाही," असंही भुजबळ म्हणाले आहेत. तसंच, "आंदोलन का सुरू आहे, हे मला माहीत नाही," असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details