महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ईव्हीएमवर 'कमळ' चिन्ह दिसत नसल्यानं आजोबा संतापले; पाहा काय आहे प्रकार - BJP kamal symbol not visible on EVM - BJP KAMAL SYMBOL NOT VISIBLE ON EVM

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 4:03 PM IST

पुणे BJP kamal symbol not visible on EVM : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेत मतदानावेळी एक आजोबा रागावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह न दिसल्यानं आजोबा चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. पुण्यातील धायरी परिसर बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह घड्याळ आहे.  तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. अजित पवार महायुतीसोबत असल्यामुळं बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळं या मतदार संघात भाजपाचं कमळ चिन्ह दिसत नाही. याचा संताप या आजोबांना आल्याचं दिसतंय. 

ABOUT THE AUTHOR

...view details