ETV Bharat / entertainment

‘ब्लॅक डॉग’ चित्रपटानं उघडणार थर्ड आय आशियाई फिल्म फेस्टिव्हलचा पडदा, 60 हून अधिक सिनेमांची रसिकांना पर्वणी - THIRD EYE ASIAN FILM FESTIVAL

21 व्या थर्ड आय आशियाई फिल्म फेस्टिव्हलचा पडदा ‘ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटानं उघडणार आहे. आशियाई देशातील 60 हून अधिक सर्वोत्तम चित्रपट पाहता येतील.

The film 'Black Dog'
ब्लॅक डॉ (Black Dog trailer screen grab)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 8 hours ago

मुंबई - २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला मुंबई आणि ठाणे येथे पार पडणार आहे. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महोत्सवात आशियाई देशातील गाजलेले चित्रपट दाखवले जाणार आहेत. या महोत्सवाची सुरुवात कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटानं होणार आहे.

या महोत्सवाचं उद्‌घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल 'एशियन कल्चर’ या विशेष पुरस्कारानं सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना गौरवलं जाणार आहे.

अंधेरीच्या मुव्ही मॅक्स चित्रपटगृहात महोत्सवाचा शुभारंभ १०जानेवारीला सायं ६.३० वा. होणार आहे. ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे रंगणार आहे.

हॉलिवूड आणि युरोपमधील चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पहाण्यासाठी सहज उपलब्ध होऊ लागले आहेत पण आशियाई चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये लोकप्रिय असलेले हे चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना दाखवण्याच्या उद्देशानं आम्ही अनेक उत्तम चित्रपट या महोत्सवात दाखवणार असल्याचं फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी सांगितलं.

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या २१ व्या आवृत्तीमध्ये आशियाई स्पेक्ट्रम विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझाकिस्तान, ट्युनिशिया, जपान, इराण, साउथ कोरिया आणि श्रीलंका या देशातील चित्रपटांचा समावेश आहे आणि साउथ कोरियामधील सहा चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील.

आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे. त्यात नवीनचंद्र दिग्दर्शित ‘झंझारपुर’, प्रबल खुंद दिग्दर्शित ‘पाई तंग’, जदुमनी दत्ता दिग्दर्शित ‘जुईफुल’ या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपट महोत्सवात मराठी स्पर्धा विभागात आठ मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.