'गांभिर्यपूर्वक' राजकारण करणारे अजित पवार पत्नीसह दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला; सुनेत्रा पवार भरणार उमेदवारी अर्ज - Sunetra Pawar - SUNETRA PAWAR
Published : Apr 18, 2024, 4:13 PM IST
पुणे Sunetra Pawar : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आजपासून पुणे विभागातील अर्ज भरण्यास सुरुवात होत आहेत. बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार सुद्धा आज आपला अर्ज दाखल करत आहेत. त्या अगोदरच सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिरात आरती करत देवाकडं जिंकून येण्याचं साकडं घातलंय. पुण्यात आज लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होत असून आज महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी एकत्र अर्ज भरला आहे. आज सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करणार आहेत. तर दुसरीकडं महायुतीकडून मात्र फक्त बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार याच अर्ज भरणार आहेत. आज आपला उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार सुमित्रा पवार यांनी पुण्यातील प्रसिद्ध अशा गणपती दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं, आरती केली आणि देवाकडं प्रार्थना केली.