महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

"माझं तिकीट राज्यानं नाही, तर देशानं ठरवलंय", पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे? - Beed Lok Sabha Constituency - BEED LOK SABHA CONSTITUENCY

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 8:18 PM IST

बीड Pankaja Munde News : भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) बीडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंडेंनी प्रचारास सुरुवात केली आहे. मात्र, लोकसभेची उमेदवारी आपल्याला राज्यातील पक्षश्रेष्ठींनी नव्हे तर पंतप्रधान मोदींनी दिल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय. बीडच्या धामणगाव येथे बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी मतांचं राजकारण करण्यासाठी नाही, तर विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आले आहे. ही जबाबदारी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. माझं तिकीट राज्यानं नाही तर देशानं ठरवलंय. देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ते ठरवलंय. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीतरी चांगलं असेल असा मला विश्वास आहे", असं त्या म्हणाल्या. यावेळी पंकजा मुंडे यांचा रोख पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपाकडं होता का?, अशी चर्चा यानिमित्तानं सुरू झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details