सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी काढलेला निष्कर्ष चुकीचा; अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया - ASHOK CHAVAN ON RAHUL GANDHI
Published : Dec 24, 2024, 10:46 PM IST
नांदेड : सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय होता म्हणून त्याची हत्या झाली असा आरोप, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. मात्र, राहुल गांधी यांनी काढलेला हा निष्कर्ष पूर्णपणे चुकीचा आहे अशी टीका, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलीय. राहुल गांधी यांचा दौरा राजकीय होता आणि त्यातून राजकारण करण्याचा त्यांचा हेतू होता असा दावा चव्हाण यांनी केलाय. राजकीय पुढाऱ्यांनी निष्कर्ष काढला तर मग पोलीस कशासाठी आहेत? तसंच नाना पटोले यांच्या वक्तव्याचा समाचार घेत चव्हाण यांनी त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलीय. राहुल गांधी यांनी परभणीचा दौरा करून सोमवारी प्रत्यक्ष भेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारातील सदस्यांची भेट घेत चर्चा केली होती. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी हे मागासवर्गीय असल्यामुळं त्यांना मारहाण केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.