डांगी जनावरांचं प्रदर्शन 2024; 'पोपट वळू' ठरला चॅम्पियन, पाहा व्हिडिओ - ANIMALS EXHIBITION IN RAJUR
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 25, 2024, 7:17 PM IST
अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील राजूर येथे दरवर्षी डोंगर भागातील देशी आणि डांगी जनावरांचं प्रदर्शन (Animals Exhibition) भरवलं जातं. त्यातून उत्कृष्ट वळुचा आणि त्याच्या मालकांचा सन्मान केला जातो. यावर्षी अकोले तालुक्यातील केळी रूम्हणवाडी येथील धोंडिबा किसन बिन्नर यांचा 'पोपट वळू' (Popat Bull) चॅम्पियन ठरला आहे. इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील भाऊसाहेब राजाराम घोटे यांचा वळू उपविजेता ठरला आहे.
खंडोबा मंदिराच्या टेकडीवर प्रदर्शन : राजूर ग्रामपंचायत कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेचा पशुधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं राजूर येथील खंडोबा मंदिराच्या टेकडीवर डांगी जनावरांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे उपस्थित होते. प्रदर्शनासाठी नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यातील तालुक्यातील डांगी तसंच देशी-विदेशी जनावरे खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली आहेत. जनावरे खरेदीसाठी व्यापारी वर्गही मोठ्या संख्येनं दाखल झाला आहे.