'झपाटलेला 3'च्या घोषणेनंतर महेश कोठारे सपत्नीक साईच्या दर्शनाला, 'तात्या विंचू' परतण्याची दिली खात्री - Mahesh Kothare
Published : Apr 19, 2024, 2:13 PM IST
|Updated : Apr 20, 2024, 9:14 AM IST
शिर्डी ( अहमदनगर ) - अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आज आपल्या पत्नी निलिमासह शिर्डीत साईबाबांच्या मंदिराला भेट दिली आणि समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी साईबाबांच्या द्वारकामाई व गुरुस्थानचेही दर्शन कोठारे यांनी घेतलं. 'झपाटलेला 3' या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर लॉंच झाले असून या चित्रपटाचे सीजी वर्क ऑस्ट्रेलियात होणार असल्याचं महेश कोठारे यांनी शिर्डीत जाहीर केलं. चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरु होणार असून अनेकांना याची उत्सुकता लागली आहे. 'झपाटलेला - 3' नव्हे तर "झपाटलेला मी तात्या विंचू" अस नाव असल्याच महेश कोठारे यांनी स्पष्ट केलंय. चित्रपटात नेमकं काय असणार हे महेश कोठारे यांनी पडद्यावर बघा, असा आपल्या स्टाईलमध्ये सल्ला दिला. महेश कोठारे यांनी आपला दिग्दर्शनची सुरुवात साईबाबांच्या टेली फिल्मने केल्याच सांगितलं. जेव्हा जेव्हा साईबाबा बोलवतात तेव्हा तेव्हा मी येतो, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
रामायण फेम सीता दीपिका चिखलीयानं साईमंदिराला भेट देऊन जागवल्या शिर्डीच्या आठवणी - Deepika Chikhalia
साईसच्चरित्र ग्रंथाचे इंग्लिशमध्ये ऑडिओ बुक, गायक सोनू निगमची पत्नी मधुरिमा निगमची साईसेवा