हैदराबाद :2024 मध्ये नवीनतम अत्याधुनिक ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) दुचाकी लाँच झाल्या. प्रगत इंजिन तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन, इंधन कार्यक्षमता, अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यासह एर्गोनॉमिक डिझाइन असलेल्या दुचाकी बाजारात क्रांती घडवून आणण्यास सज्ज आहे. परवडणारी क्षमता आणि पर्यावरणीय परिणामांवर लक्ष केंद्रित करून, नवीन ICE दुचाकी मॉडेलनं पर्यावरणासह जागरूक रायडर्सचं लक्ष वेधून घेतलंय.
Ola Roadster : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकनं आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल सीरीज ओला रोडस्टर 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतात लाँच केली होती. रोडस्टर एक्स, रोडस्टर आणि रोडस्टर प्रो अशा एकूण तीन व्हेरियंटमध्ये ही बाईक सादर करण्यात आली होती. हे सर्व प्रकार वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह येतात. या बाइक रेंजच्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत म्हणजेच ओला रोडस्टर 74 हजार 999 ठेवण्यात आली होती.
Ola Roadster मालिकेची किंमत : रोडस्टर एक्सच्या एंट्री लेव्हल वेरिएंटबद्दल बोलायचं झाल्यास, हे मॉडेल 2.5kWh, 3.5kWh आणि 4.5kWh तीन बॅटरी पॅकमध्ये येते. ज्यांच्या किंमती अनुक्रमे 74 हजार 999 रुपये, 84 हजार 999 रुपये आणि 99 हजार 999 रुपये एक्स-शोरूम होती. तर मिड व्हेरिएंट रोडस्टर 3 kWh, 4.5kWh आणि 6kWh च्या तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केली होती. ज्याची किंमत रु 1 लाख 4 हजार 999, रु 1 लाख 19 हजार 999 आणि रु 1 लाख 39 हजार 999 एक्स-शोरूम होती. याशिवाय, कंपनीने फक्त 8kWh आणि 16kWh च्या दोन बॅटरी पॅकसह रोडस्टर प्रो हा उच्च प्रकार सादर केला आहे. ज्याची किंमत अनुक्रमे 1 लाख 99 हजार 999 रुपये आणि 2 लाख 49 हजार 999 रुपये होती.
शक्ती, कार्यप्रदर्शन आणि श्रेणी :बॅटरीची क्षमता आणि किमतींव्यतिरिक्त, रोडस्टर एक्स आणि रोडस्टरच्या सुरुवातीच्या दोन व्हेरियंटचं स्वरूप आणि डिझाइन मोठ्या प्रमाणात समान आहेत. रोडस्टरचे शीर्ष मॉडेल या प्रकाराचा टॉप स्पीड 124 किमी/तास आहे. तर दुसऱ्या मॉडेल रोडस्टरचा टॉप 6kWh प्रकार एका चार्जमध्ये 248 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. या प्रकाराचा टॉप स्पीड 126 किमी/तास आहे. रोडस्टर प्रो बद्दल बोलायचं, तर त्याची किंमत सर्वात जास्त आहे. 16kWh बॅटरी पॅकसह त्याच्या टॉप मॉडेलबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही बाईक एका चार्जमध्ये 579 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. या बाईकमध्ये 52kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 105Nm टॉर्क जनरेट करते. त्याचा टॉप स्पीड 194 किमी/तास आहे. ही केवळ 1.6 सेकंदात 0 ते 60 किमी/ताशी वेग वाढविण्यास सक्षम आहे.
उत्कृष्ट वैशिष्ट्ये :रोडस्टर एक्स मध्ये, कंपनीनं स्पोर्ट्स, नॉर्मल आणि इकोसह तीन राइडिंग मोड दिले आहेत. यात 4.3-इंचाचा LCD डिस्प्ले देखील आहे जो MoveOS वर चालतो. ओला मॅप्स नेव्हिगेशन (टर्न-बाय-टर्न), क्रूझ कंट्रोल, डीआयवाय मोड, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ओटीए अपडेट, डिजिटल की सारखी वैशिष्ट्ये यामध्ये देण्यात आली आहेत. ओला इलेक्ट्रिकच्या स्मार्टफोन ॲपवरूनही तुम्ही ही बाईक ऑपरेट करू शकता.
(AI) आधारित वैशिष्ट्ये :रोडस्टर अर्थात दुसऱ्या प्रकारात आणखी काही वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यात हायपर, स्पोर्ट, नॉर्मल आणि इको असे चार ड्रायव्हिंग मोड आहेत. यात मोठी 6.8 इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले सिस्टीम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित वैशिष्ट्ये जसे की प्रॉक्सिमिटी अनलॉक, क्रूझ कंट्रोल, पार्टी मोड, छेडछाड अलर्ट, क्रुट्रिम सहाय्य देखील आहे.
10 इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले :रोडस्टर प्रोच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, स्टील फ्रेमवर आधारित या बाईकमध्ये पुढील बाजूस अप-साइड-डाउन (USD) फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आहे. यात 10 इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले आहे. कंपनीनं या बाइकमध्ये 4 राइडिंग मोड (हायपर, स्पोर्ट, नॉर्म आणि इको) देखील समाविष्ट केले आहेत. याशिवाय, यात दोन सानुकूल मोड देखील आहेत जे ग्राहक त्यांच्या गरजेनुसार जोडू शकतात.
Honda Activa E : भारतीय बाजारात Honda ची नवीन Activa E सादर झाली आहे. ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक दुचाकी असून तीला कंपनीनं Activa E असं नाव दिलंय. कंपनीनं ही दुचाकी दोन व्हेरियंटमध्ये लॉंच केली आहे. यामध्ये स्टँडर्ड आणि सिंक डुओचा समावेश आहे. मात्र, कंपनीनं अद्याप या दुचाकीच्या किमती जाहीर केल्या नाहीत. 1 जानेवारीपासून दुचाकीची किंमत जाहीर केली जाईल. त्याच दिवशी बुकिंग देखील सुरू होईल. तसंच डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल. त्यांची प्रथम दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये विक्री केली जाईल.