हैदराबाद : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाताद्वारे 24 नोव्हेंबर रोजी कॉमन ॲडमिशन टेस्ट 2024 घेण्यात आली. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांसाठी उत्तर पत्रिका जारी करण्यात आली होती, ज्यावर 5 डिसेंबरपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते. यानंतर, 17 डिसेंबर रोजी या परीक्षेसाठी अंतिम उत्तर पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. आता परीक्षेत बसलेले उमेदवार निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.
CAT चा निकाल कुठं बघायाचा : आयआयएम कलकत्तानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निकाल जानेवारी 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
हा निकाल IIM ची अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर ऑनलाइन जाहीर केला जाईल. निकाल जाहीर होताच, उमेदवार खाली दिलेल्या पायऱ्यांचं अनुसरण करून निकाल तपासू शकतील. तसंच त्यांचं स्कोअरकार्ड देखील डाउनलोड करू शकतील.
- सीएटी परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जावं लागेल.
- येथे तुम्हाला CAT 20254 स्कोअरकार्ड लिंकवर क्लिक करावं लागेल.
- आता तुम्हाला युजर आयडी, पासवर्ड आणि दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन करावं लागेल.
- यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तो डाउनलोड करू शकाल.
स्कोअरकार्ड एक वर्षासाठी वैध : CAT परीक्षा 2024 चं स्कोअरकार्ड डिसेंबर 2025 पर्यंत वैध असेल. कॉमन ॲडमिशन टेस्ट 2024 ची परीक्षा 24 नोव्हेंबर रोजी तीन स्लॉटमध्ये घेण्यात आली होती. पहिला सकाळी 8:30 ते 10:30, दुसरा स्लॉट दुपारी 12:30 ते 2:30 आणि तिसरा स्लॉट दुपारी 4:30 ते 6:30 असा होता. ही परीक्षा देशभरातील 170 शहरांमधील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेत मिळालेल्या रँकच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षेशी संबंधित इतर तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
हे वाचलंत का :