ETV Bharat / technology

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? एका क्लिकवर 'इथं' करा डायरेक्ट अर्ज - PMAY

PMAY 2.0 चा भाग म्हणून, सरकारचा 1 लाख नवीन घरे बांधण्याचा मानस आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला 2.30 लाख रुपयांचं आर्थिक अनुदान मिळेल.

Pradhan Mantri Awas Yojana
प्रधानमंत्री आवास योजना (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 19, 2024, 7:27 AM IST

Pradhan Mantri Awas Yojana : केंद्र सरकारनं शहरी भागात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा (pmay 2.0) चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळानं शहरी भागातील ईडब्ल्यूएस आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी डिझाइन केलेल्या या योजनेला मान्यता दिली.

pmay 2.0 चा भाग म्हणून, सरकारचा 1 लाख नवीन घरे बांधण्याचा मानस आहे, ज्यापैकी प्रत्येकाला 2.30 लाख रुपयांचे आर्थिक अनुदान मिळेल. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं अहवाल दिला की पीएमएवाय-शहरी च्या मागील टप्प्यात 1.18 लाख घरे मंजूर करण्यात आली होती, ज्यापैकी 8.55 लाखांहून अधिक घरे पूर्ण झाली आहेत, आणि ती प्राप्तकर्त्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : PMAY-U 2.0 अंतर्गत 1 लाख नवीन घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र व्यक्ती आता त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करू शकतात. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी परवडणारे घरांचे पर्याय प्रदान करण्याच्या उद्देशानं सरकार-समर्थित गृहनिर्माण योजना आहे. या उपक्रमाचं ध्येय 31 मार्च 2022 पर्यंत 20 दशलक्ष परवडणारी घरे बांधणे आहे. ही योजना दोन घटकांमध्ये विभागली गेली आहे. शहरी रहिवाशांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (PMAY-U) आणि ग्रामीण रहिवाशांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (PMAY-G आणि PMAY-R). PMAY-U गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे देखरेख केली जाते, तर PMAY-G आणि PMAY-R ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे व्यवस्थापित केली जाते.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया :

अर्ज करण्यासाठी खालील चरणांचं अनुसरण करा:

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

  • प्रथम PMAY -शहरी वेबसाइटवर लॉगिन करा.
  • फॉर्म भरण्यासाठी पर्याय निवडा.
  • “पीएमएवाय-यू 2.0 साठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • सूचना वाचा : अर्जासाठी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • पात्रता तपासा :
  • तुमचं वार्षिक उत्पन्न आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करून पात्रता तपासा.
  • आधार पडताळणी :
  • आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करून तुमची ओळख सत्यापित करा.
  • तपशील भरा : नोंदणी फॉर्ममध्ये तुमचं नाव, पत्ता, उत्पन्न तपशील आणि इतर माहिती प्रविष्ट करा.
  • फॉर्म सबमिट करा : अर्ज फॉर्म सबमिट करा आणि अर्जाच्या स्थितीची माहिती मिळेपर्यंत वाट पहा.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं :

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र (पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र)
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • बँक तपशील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

प्रधानमंत्री आवास योजना 2.0 केवळ शहरी भागातील घरांची कमतरता दूर करणार नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा आधार देईल. यामुळं शहरी विकासाला चालना मिळणाप आहे.

2024-25 मध्ये महाराष्ट्रात किती घरं झाली मंजूर :

ग्रामीण विकास मंत्रालयानं 2024-25 मध्ये महाराष्ट्राला PMAY-G अंतर्गत एकूण 6 लाख 37 हजार 089 घरे मंजूर केली होती. राज्यात आतापर्यंत 6 लाख 25 हजार 167 घरांची नोंदणी झाली आहे. मात्र, यापैकी केवळ 5 लाख 69 हजार 091 घरांना जिओ टॅग मिळाले आले आहे, म्हणजेच या घरांचे लोकेशन ऑनलाइन पाहता येणार आहे. 2016 पासून सरकारनं महाराष्ट्रात 20 लाख 4 हजार 366, छत्तीसगडमध्ये 11 लाख 76 हजार 150 आणि झारखंडमध्ये 17 लाख 5 हजार 355 घरे बांधण्यास मान्यता दिली आहे. त्यापैकी आतापर्यंत अनुक्रमे 12 लाख 57 हजार 408, 11 लाख 735, 15 लाख 62 हजार 511 घरे पूर्ण झाली आहेत.

हे वचालंत का :

  1. Kia Syros एसयूव्ही आज भारतात लाँच होणार, एसयूव्हीची वैशिष्ट्ये, किंमत आणि डिझाइन जाणून घ्या..
  2. OnePlus 13, OnePlus 13R प्रतिक्षा संपली, 'या' तारखेला करणार धमाका
  3. नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 20 डिसेंबर होणार लॉंच, बॅटरीसह अधिक फीचर मिळण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.